महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
देवेंद्र फडणवीसच 'पुन्हा' मुख्यमंत्रिपदी का? भाजपने या निर्णयासाठी एवढा वेळ का घेतला?
भाजपला जर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं तर मग याबाबतची घोषणा करण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा वेळ का घेतला?
अजित पवारांनी भर पत्रकार परिषदेत घेतली एकनाथ शिंदेंची फिरकी, नेमकं काय घडलं?
महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महायुतीने एकमताने पाठिंबा दिला असून. 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, असा आहे त्यांचा राजकीय प्रवास
देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्री होतील असे जाहीर करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, कोण होईल मुख्यमंत्री?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 288 जागांपैकी 230 जागांवर दणदणीत विजय मिळाल्याने पुन्हा एकदा युतीच्या सत्तास्थापनेचा मार्ग स्पष्ट आहे. पण निकाल जाहीर होऊन 48 तास उलटून गेले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स कायम आहे.
शेतमालाच्या भावापेक्षा 'एक है तो सेफ है,' 'व्होट जिहाद' हे मुद्दे कसे परिणामकारक ठरले?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेतीच्या प्रश्नांना मतदानात फारसं स्थान न मिळाल्याचं दिसून येतंय.
राज ठाकरेंच्या मनसेची 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता रद्द होऊ शकते का?
राज ठाकरेंनीही राज्यभर सभांचा धडाका लावला. असं असूनही विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या या दारुण पराभव झाल्याने आता मनसेचं भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महायुतीच्या बाजूने 'त्सुनामी'सारखा निकाल येईल याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना का आला नाही?
महाराष्ट्रात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पूर्णपणे कौल मिळाला आहे. भाजपला तर 132 जागा जिंकता आल्या. हा निकाल धक्कादायक असल्याचं विश्लेषण अनेकजण करत आहेत. तसेच ही लाट नव्हे तर एक त्सुनामी असल्याचंही बोललं जातंय.
व्हीडिओ, महाराष्ट्राच्या निकालाचा अर्थ काय? कुमार केतकर यांचं सविस्तर विश्लेषण, वेळ 31,53
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा आहे. महायुतीलाा स्पष्ट बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीच्या फक्त 49 जागा निवडून आल्या आहेत. या निकालाचं कुमार केतकर यांनी विश्लेषण केलं आहे.
चांदा ते बांदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या संपूर्ण 288 उमेदवारांची यादी
राज्यातील एकूण 288 मतदारसंघांमध्ये कुणाचा विजय झाला आणि कोण दुसऱ्या क्रमांकावर राहिलं त्याची संपूर्ण यादी इथे देत आहोत.
व्हीडिओ
व्हीडिओ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय? निखिल वागळे यांचं विश्लेषण, वेळ 14,18
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्याशी संवाद साधला.
व्हीडिओ, स्पर्धापरीक्षा, पदभरती, रोजगार; पुण्याच्या तरुणांना निवडणुकीकडून काय हवंय?, वेळ 13,48
यंदाच्या महाराष्ट्र निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का मोठा आहे. या निवडणुकीकडून तरुणांच्या काय अपेक्षा आहेत? निवडणूक प्रचार आणि जाहीरनामे यांच्यातल्या कोणत्या गोष्टी तरुण मतदारांना कामाच्या वाटतात आणि कोणत्या बिनकामाच्या वाटतात?
व्हीडिओ, सुधीर मुनगंटीवार म्हणतात, 'ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणं कुणालाही शक्य नाही' , वेळ 15,31
ज्येष्ठ भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढत आहेत.
व्हीडिओ, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तुम्ही आहात का? नाना पटोलेंनी दिलं उत्तर, वेळ 8,51
महाविकास आघाडीत जागावाटपावरून बरंच नाट्य रंगलं. ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून ओढाताण झाली. यामागे नेमकं कारण काय? राहुल गांधी याबाबत नाराज होते का?
व्हीडिओ, राज ठाकरेंच्या घरापर्यंत सदा सरवणकर गेले, पण भेट नाकारल्यानं परत; काय घडलं नेमकं?, वेळ 5,57
मनसेच्या अमित ठाकरेंसाठी त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी असं भाजपच्याही काही नेत्यांनी सुचवलं होतं. राज ठाकरेंनी सरवणकरांना भेट नाकारल्यानंतर ते आता निवडणूक लढवतायत.
व्हीडिओ, महाराष्ट्राची गोष्ट : मराठा आरक्षण आणि जातीचं राजकारण; डॉ. सदानंद मोरेंना काय वाटतं?, वेळ 35,24
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा कसा परिणाम होणार? याबाबत बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी सदानंद मोरे यांच्याशी संवाद साधला.
व्हीडिओ, विधानसभा निवडणुकीतील वंचितच्या तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील कोण आहेत?, वेळ 9,38
वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
स्पेशल रिपोर्ट
स्पर्धा परीक्षांचं जाळं, सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे आणि पुण्यातलं फ्लेक्सचं राजकारण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं बीबीसी मराठी राज्यातील तरुणांशी संवाद साधत, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. पुण्यात तर राज्यभरातून तरुण शिक्षण-नोकरीसाठी येतात. त्यांच्यासाठी 'कामाच्या गोष्टी' कोणत्या आहेत?
'आदिवासी आमदार, खासदार आहेत; पण ते आमचा आवाज होत नाहीत'
स्वातंत्र्याला 75 हून अधिक वर्षं लोटली तरी अद्याप आदिवासी समुदायाला राज्य स्तरावर सर्वांचे नेतृत्व करता येईल अशी राजकीय संधी मिळाली नाहीये. आदिवासी समुदाय अद्यापही सत्तेच्या केंद्रापासून दूर का?
विधानसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लीम कुठे आहेत?
शैक्षणिक आणि आर्थिक भ्रांतीत अडकलेला मुस्लीम समाज, धर्माधारित राजकारणातलं निर्णायक साधन झाला आहे. त्यांचा प्रश्न आहे, मुस्लिमांचा आर्थिक-राजकीय सत्तेतला वाटा कुठे आहे?
'आरक्षणामुळे पद दिलं जातं, पण निर्णय प्रक्रियेत स्थान नाही', महाराष्ट्रात दलितांचा राजकीय वाटा कुठे आहे?
दलित समुदायाला महाराष्ट्रात सत्तेत अपेक्षित वाटा अजूनही मिळाला नाही, हे जळजळीत वास्तव आहे. म्हणूनच, 'आमचा आवाज कुठे आहे, आमचा वाटा कुठे आहे' हे प्रश्न गावकुसांतून शहरी वस्त्यांपर्यंत विचारले जात आहेत.
हमीभावाचं आश्वासन, दिवाळीचा सण आणि निवडणुका; सोयाबीन उत्पादकांची नाराजी कुणाला भोवणार?
लोकसभा निवडणुकीत शेतमालाच्या घसरलेल्या भावाचा महायुतीला फटका बसला होता. सध्या सोयाबीनचे दर पडले आहेत. त्याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार?