Step into an infinite world of stories
मुद्राराक्षस म्हणजे मुद्रेच्या -अंगठीच्या योगे जिंकला गेलेला राक्षस. नाव राक्षस असले तरी हा सदगुणी अमात्य अत्यंत स्वामीनिष्ठ आहे! त्याच्या याच गुणासाठी चाणक्याला तो चंद्रगुप्ताचा अमात्य व्हावा अशी इच्छा आहे. चंद्रगुप्ताला मगधाचे राज्य मिळवून दिल्यावर निःस्वार्थी चाणक्याला त्याच्या अमात्यपदात गोडी नाही. बळाचा वापर न करता राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूस कसे वळवता येईल याच्या युक्त्याप्रयुक्त्यांनी भरलेले हे नाटक ! मुद्राराक्षस हे संस्कृत साहित्यातील एक नितांतसुंदर नाटक आहे. राजकीय कथानक, शृंगाररसाचा अभाव आणि स्त्रीपात्र नसलेल्या या नाटकाच्या कथानकाची वीण इतकी घट्ट आहे की आपण त्यात रंगून जातो. कौटील्य अर्थशास्त्राची रचना करणारा चाणक्य हाच याची साक्ष जागोजागी मिळते.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789354837845
Release date
Audiobook: 2 September 2023
English
India