Step into an infinite world of stories
सहा फूट उंचीचा, सडपातळ शरीराचा , गोरापान , चेहऱ्यावरून एखाद्या नाटकातील हिरोसारखा, भावनाप्रधान दिसणारा ! एकदम साधा वाटायचं. पण प्रतिस्पर्ध्याचा अंदाज नेहमी इथेच चुकायचा. अन चूक उलगडायची जेव्हा मंदारची मगरमिठी त्याच्या भोवती असायची.मंदार पटवर्धन ! सुहास शिरवळकरांचा आणखीन एक लाडका मानसपुत्र ! तो गुप्तहेर आहे हुशार आहे अन तितकाच तल्लख बुद्धीचाहि . डॉ.बंकिम एका टॅब्लेट फॉर्म्युल्याचा शोध लावतात, तो फॉर्मुला विकत घेण्यासाठी चीनची तयारी असते, पण हा फॉर्मुला मिळवण्याची कोणा दुसऱ्याचीच धडपड सुरु असते आणि तिथेच डॉ. बंकिम चक्रवर्तीच्या अपहरणाचा प्रयत्न केला जातो . या अपहरणामागे नेमका कोणाचा हात होता ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण साहसप्रधान कादंबरी,? सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून अवतरलेली उत्कंठावर्धक कादंबरी , गोल्ड हेवन ........ ऐका , कृणाल आळवे यांच्या आवाजात !
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648301
Release date
Audiobook: 4 December 2024
English
India