Step into an infinite world of stories
संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र. लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356043992
Release date
Audiobook: 12 June 2022
English
India