Jump to content

सैफ अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सैफ अली खान
जन्म १६ ऑगस्ट, १९७० (1970-08-16) (वय: ५४)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९९२ - चालू
वडील मन्सूर अली खान पटौडी
आई शर्मिला टागोर
पत्नी अमृता सिंग (१९९१-२००४)
करीना कपूर (२०१२-चालू)
नातेवाईक सोहा अली खान (बहीण)

सैफ अली खान ( १६ ऑगस्ट १९७०) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पटौदीबॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. आज सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो.

व्यक्तिगत जीवन

[संपादन]

सैफ अली खान यांची पत्नी करीना कपूर व मुलगी सारा अली खान सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेत.

सैफ अली खान हा नास्तिक आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला होता की, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे. धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते. कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो. मला वाटते

चित्रपट यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट पुरस्कार
१९९२ परंपरा
१९९३ आशिक आवारा फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
१९९३ पेहचान []
१९९४ इम्तिहान
१९९४ ये दिल्लगी
१९९४ मैं खिलाडी तू अनाडी
१९९४ यार गद्दार
१९९४ आओ प्यार करें
१९९५ सुरक्षा
१९९६ एक था राजा
१९९६ बंबई का बाबू
१९९६ तू चोर मैं सिपाही
१९९६ दिल तेरा दीवाना
१९९७ हमेशा
१९९७ उडान
१९९८ कीमत
१९९८ हमसे बढकर कौन
१९९९ ये है मुंबई मेरी जान
१९९९ कच्चे धागे
१९९९ आरजू
१९९९ बिवी नं. १
१९९९ हम साथ साथ हैं
२००० सनम तेरी कसम
२००० क्या कहना
२००१ लव्ह के लिये कुछ भी करेगा
२००१ दिल चाहता है
२००१ रहना है तेरे दिल में
२००२ ना तुम जानोना हम
२००३ डरना मना है
२००३ कल होना हो फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार
२००३ एल.ओ.सी. कारगिल
२००४ एक हसीना थी
२००४ हम तुम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
२००५ परिणीता
२००५ सलाम नमस्ते
२००६ बीईंग सायरस
२००६ ओंकारा
२००७ एकलव्य
२००७ नेहले पे देहला
२००७ ता रा रम पम
२००८ रेस
२००८ टशन
२००८ वूडस्टॉक व्हिला
२००८ थोडा प्यार थोडा मॅजिक
२००९ लव्ह आज कल
२००९ कुर्बान
२०११ आरक्षण
२०१२ एजंट विनोद
२०१२ कॉकटेल
२०१३ रेस २
२०१३ गो गोवा गॉन
२०१३ बुलेट राजा

बाह्य दुवे

[संपादन]


  1. ^ ""मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…"; धर्म, देव आणि पुनर्जन्मावर सैफ अली खानने केला खुलासा". Loksatta. 2021-09-09. 2021-09-10 रोजी पाहिले.