राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
भारतातील वार्षिक सरकारी पुरस्कार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | award for best leading actor, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
Next higher rank | |||
प्रायोजक | |||
| |||
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.
राज्य पुरस्काराने १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा भारत पुरस्कार" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. १९७५ मध्ये, त्यास "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत कमल पुरस्कार" असे नाव देण्यात आले. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, कन्नड आणि इंग्रजी अशा सात प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.
पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता बंगाली सिनेमाचा उत्तमकुमार होता, ज्याला ॲंटनी फिरंगी आणि चिरियाखाना मधील कामगिरीबद्दल १९६७ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच वर्षी दोन भिन्न चित्रपटांसाठी हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला अभिनेताही होता. २०१८ पर्यंत, अमिताभ बच्चन हे चार पुरस्कारांसह सर्वाधिक सन्मानित अभिनेते आहेत. त्यांना अग्निपथ (१९९० चित्रपट, ब्लॅक (चित्रपट) (२००५), पा (चित्रपट) (२००९) आणी पीकू (२०१५) साठी पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर कमल हासन आणि मामूट्टी यांना तीन पुरस्कार देण्यात आले आहेत. अभिनेते संजीव कुमार, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, मोहनलाल आणि अजय देवगण या सहा कलाकारांनी हा पुरस्कार दोन वेळा जिंकला आहे.
दोन कलाकारांनी मिथुन चक्रवर्ती (हिंदी आणि बंगाली) आणि मामूट्टी (मल्याळम आणि इंग्रजी) अशा दोन भाषांमध्ये कामगिरी करण्याचा मान मिळविला आहे. २०१७ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी रिद्धि सेन ने सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळवला आहे. सर्वात अलीकडील प्राप्तकर्ते आयुष्मान खुराणा आणि विक्की कौशल आहेत ज्यांना अंधाधुन आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक या हिंदी चित्रपटांमधील ६६व्या राष्ट्रीय पुरस्काराने अनुक्रमे गौरविण्यात आले.