Jump to content

प्रशांत महासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
EmausBot (चर्चा | योगदान)द्वारा ०५:१६, १४ सप्टेंबर २०१२चे आवर्तन
पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर

प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशियाऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.

प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.

युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.


भोवतालचे देश व प्रदेश

सार्वभौम देश


भूभाग

मोठी शहरे व बंदरे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA