सदाशिवराव भाऊ
सदाशिव चिमाजी अप्पा भट तथा सदाशिवराव भाऊ (३ ऑगस्ट , इ.स. १७३० - जानेवारी १४ / जानेवारी २०, इ.स. १७६१) हे मराठा साम्राज्यातील एक सेनापती व नासाहेब पेशव्यांचे चुलतभाऊ होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवरावभाऊही या लढाईत मारले गेले असल्याचे समजले जाते.[१]
चिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिवरावभाऊ आईविना आजी राधाबाई साहेब यांच्याकडे लहानाचे मोठे झाले. अप्पा नेहमीच बाजीराव साहेबांबरोबर मोहिमेवर असायचे. लहानग्या सदाशिवाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसायची. त्यानंतर सदाशिवराव शाहू महाराजांकडे दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच तलवारबाजीत. पुढे नानासाहेबांच्या लग्नानंतर नाना आणि भाऊमध्ये अंतर पडू लागले. याला कारण गोपिकाबाई. त्यांनी फक्त आपले आणि आपल्या मुलांचे कसे होईल याचाच विचार केला.[ संदर्भ हवा ] खूप दिवस गोपिकाबाईंमुळे भाऊ शनिवारवाड्यावर येऊ शकले नाही. ते साताऱ्याला होते. शेवटी शाहूराजांनी आज्ञा दिली आणि नानासाहेबांनी भाऊंना पुण्याला नेले. त्यानंतर भाऊंनी दौलतीचे कारभारी म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांच्या काळात मोठ्यातल्या मोठा माणूस भाऊंपुढे यायला घाबरायचा. त्यांचा हिशोब इतका पक्का की ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे.[ संदर्भ हवा ]
भाऊंनी पहिल्यांदा लढाईमध्ये नेतृत्व दाखवले ते निजामाविरुद्ध, आणि त्यावेळी त्यांनी दौलताबादचा किल्ला सर केला. हरलेला निजाम जेव्हा हात बांधून आला, तेव्हा भाऊंनी इब्राहीमखान गारदी यास निजामाकडून मागून आपल्या सैन्यात घेतले. उमाबाई ही सदाशिवरावभाऊंची पत्नी. ती वारल्यावर भाऊंनी पेणचे सावकार कृष्णराव ऊर्फ भिकाजी नाईक कोल्हटकर यांची कन्या पार्वतीबाई यांच्याशी विवाह केला.
सदाशिवरावभाऊंवरील पुस्तक
[संपादन]- सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ (लेखक - कौस्तुभ कस्तुरे)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |