सदस्य चर्चा:श्रीहरि
स्वागत | श्रीहरि, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | श्रीहरि, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९०१ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
दिनमान, दिनविशेष, इ.
[संपादन]नमस्कार,
आपण रोजचे दिनमान व दिनविशेष लेख लिहित असल्याचे पाहून आनंद झाला. विकिपीडियाला आपल्यासारख्या उत्साही सदस्यांची गरज आहे.
मला आपल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सुचवावेसे वाटते की आपण हे करताना यापूर्वीच्या पानांकडे कक्ष देउन नवीन बदल करावेत. उदा. दिनविशेष लेखात २-३ ठळक घटनांचाच उल्लेख असतो, त्यात एक चित्र असते, इ. वानगीदाखल Wikipedia:दिनविशेष/मार्च १ हा लेख बघावा.
रोजच्या दिनमान लेखासाठी मार्च १ हा लेख पहावा. त्यात इ.स.चे उल्लेख, राज्यकर्ते, पोप, इ.चे उल्लेखही पहावे.
कोणतेही प्रश्न, याबद्दल किंवा इतर, असल्यास कृपया मला संदेश द्यावा किंवा चावडीवर प्रश्न विचारावा.
पुन्हा एकदा आपले स्वागत.
अभय नातू ०४:३८, १२ मार्च २००७ (UTC)
ग्रेगोरियन महिने
[संपादन]नमस्कार,
ग्रेगोरियन महिने हा साचा तयार केल्याबद्दल धन्यवाद. मी क्रिकाम्या हा सांगकाम्या वापरून हा साचा सगळ्या दिवस-पानांवर घातला आहे तरी नमून्यादाखल ३-४ पाने उघडुन हा बदल बरोबर आहे हे तपासून पहावे. काही चूक आढळल्यास कळवावे.
अभय नातू ०१:३८, २१ जुलै २००७ (UTC)
अशुद्धलेखन असलेले लेख
[संपादन]नमस्कार,
आपण अशातच जुन १, जुन ९, जुन २१ असे नवीन लेख लिहीलेले आढळले. हे लेख फक्त त्यांच्या व्याकरणदृष्ट्या योग्य नावाच्या संबंधित लेखांकडे, अर्थात अनुक्रमे जून १, जून ९, जून २१ कडे, पुनर्निर्देशन करणारे आहेत. परंतु मला यामागचा उद्देश नेमका कळाला नाही. कारण आपण देखील जाणताच की, नवीन लेखांच्या शीर्षकातील शब्द व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहेत. मग अशा शब्दांना विकिपीडियाने स्थान देण्याबाबत काही धोरण आधीच ठरलेले आहे का; व आपण त्याअंतर्गत असे केले आहे का?
जुन १, जुन ९, इ. ही पुनर्निर्देशने तयार करण्यामागची कारणे अशी --
काही इतर पानांवर जुन १, जुन ९... असे दुवे मला आढळले. ते दुवे कोणत्याच पानांकडे निर्देशित नव्हते. अन्य लेखकांनी हे दुवे पाहिले असता त्यांनी जुन १ असा (चुकीचा) लेख तयार करण्याची शक्यता होती. तसेच जुन १ हा दुवा इतर किती व कोणत्या पानांवर आहे हे माहिती नाही. अशी सगळी पाने धुंडाळुन त्यावरील अशुद्ध लेखन बदलणे किंवा जुन १ चे जून १ कडे पुनर्निर्देशन करणे हे दोन उपाय प्रस्तुत होते. त्यातील दुसरा उपाय हा जास्त सयुक्तिक वाटतो कारण असे केल्याने जुन १ कडे असलेले सगळे दुवे आपोआप बरोबर पानांकडे जातील तसेच सगळी पाने शोधत आत्ताच्या आत्ता बसावे लागणार नाहीत. जसजसे जुन १चे दुवे सापडतील तसतसे तेथील शुद्धलेखन बदलता येईल. तसेच कालांतराने एखाद्या सदस्याने जुन १ असा (अशुद्ध) शोध घेतला तरी त्याला जून १ हा शुद्धलेखन बरोबर असलेले लेख मिळेल.
असेच काहीसे वर्ष पानांबाबत आहे. ई.स. ही पाने इ.स.कडे पुनर्निर्देशित हवी. मराठी विकिपीडियाच्या सुरुवातील ही पाने ई.स. मथळ्याखाली तयार केली गेली. सध्या असा बेत आहे की सगळी पाने इ.स.-->ई.स. अशी पुनर्निर्देशने करावी व क्रिकाम्या किंवा तत्सम सांगकाम्या वापरुन एकगठ्ठा बदल घडवून आणावा.
विकिपीडिया हे मिडीयाविकि या प्रणालीवर चालते. ही पूर्णतः पी.एच.पी. मध्ये लिहीलेली प्रणाली आहे व त्यात मिडीयाविकिवरील अधिकृत सदस्यांशिवाय बदल करता येत नाहीत. तेथे सी, इ. भाषांमध्ये प्लग-इन वगैरे घालता येतील पण तो अधिकार आम्हांस नाही. भविष्यात मिडीयाविकिने हा अधिकार आपल्याला दिल्यास असे नक्कीच करता येईल.
क.लो.अ.
अभय नातू १६:२२, २१ जुलै २००७ (UTC)
ता.क. आपण नवीन लेख तयार कराल तेव्हा शक्यतो त्यात इंग्लिश (अथवा इतर) विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकि दुवा द्यावा. उदा. डिसेंबर ३१ या लेखात [[en:December 31]] असे लिहावे. त्याने हा दुवा तर तयार होईलच परंतु इतर अनेक सांगकाम्यांना लेखाचा संदर्भ मिळेल व ते इतर भाषांतील लेखांचे आंतरविकि दुवे घालू शकतील.
अशुद्धलेखन असलेले लेख
[संपादन]- नमस्कार,
- आपण म्हणालात की, जुन १ वगैरे चुकीच्या पानांकडे किती दुवे निर्देश करतात त्याचा अंदाज येणे कठीण असल्याने आपण हा मार्ग निवडला. पण चांगली गोष्ट म्हणजे यावर विकिपीडियाने मुळातच एक नेमका उपाय देऊन ठेवला आहे. प्रत्येक पानावर डावीकडे काही दुवे नेहमी आपल्या मदतीसाठी तत्पर असतात, आणि त्यापैकी एक म्हणजे येथे काय जोडले आहे किंवा जसे इंग्रजीतील What links here. ही फार द्रष्टेपणाने ठेवलेली सोय आहे व मला फार प्रभावित करून गेली. ती वापरून आपण सांगकाम्याला अशा सर्व ठिकाणे दुरुस्ती करून यायला सांगू शकतो आणि मग ते चुकीच्या शीर्षकाचे पान पूर्णपणे मिटवू शकतो.
- आपण उल्लेखिलेला दुवा (येथे काय जोडले आहे) हा पुनर्निर्देशनांसाठीही लागू आहे. उदा. जून १ पानावरील हा दुवा जून १ कडे निर्देशित होणारी पाने दाखवतो तसेच जुन १चेही दुवे दाखवतो (पुनर्निर्देशनासह). याबद्दल अजून खाली...
- आणखी एक शंका म्हणजे आपण प्रबंधक या नात्याने व अधिकाराने अशा चुकीच्या शीर्षकांचे लेख पूर्णपणे खोडून टाकू शकत नाहीत का? कारण याचे दुहेरी नुकसान म्हणजे अ-प्रमाणित (non-standard) शब्दांना आधार दिल्याचा संदेश पोहोंचतो आणि दुसरे म्हणजे विनाकारण मराठी विकिपीडियावरील लेखांची संख्या वाढलेली दिसते. उदाहरणच द्यायचे झाल्यास सर्व ई.स. चे सर्व लेख उद्या आपण सांगकाम्या वापरून इ.स. वर ठेवले व जुने लेख केवळ इ.स. या योग्य शीर्षकांकडे निर्देशन करत राहिले तर हजारभर तरी लेख जास्त असल्याचे आभासी स्तरावर दिसेल, जे की संयुक्तिक वाटत नाही.
- असे चुकीचे लेख शोधत असताना वाचकाची निराशा होण्यापेक्षाही अशा वाचक/लेखकाने या दुव्यावरुन चुकीच्या शीर्षकाची पाने तयार करण्याची भीती जास्त आहे. समजा वाचक अबकने जुन १ हा दुवा पाहिला व या दुव्याचा माग घेत असता त्याला कळले की हा लेख अस्तित्त्वात नाही. अबकला जुन बरोबर कि जून हे नक्की माहिती नाही तरी विकिपीडियात भर घालण्यासाठी तो जुन १ हे पान सुरू करेल व त्यात माहिती घालेल. अशा प्रकारे जुन १ व जून १ ही दोन्ही पाने तयार होतील. हीच कथा शोध घेतानाही होईल. अबकने जुन १ असे शोधल्यास ते पान मिळणार नाही व तो/ती हे पान तयार करण्याची शक्यता दाट आहे. मराठी विकिपीडियावर असे अनेक वेळेस झालेले आहे, उदा. कोल्हापुर, कोल्हापूर हे दोन लेख दोन सद्हेतुक लेखकांनी बरेच मोठे केले होते. बहुधा दोघांनीही एक-दुसर्याचे काम पाहिले नव्हते. नंतर कोल्हापूर हा लेख ठेवून कोल्हापुरमधील मजकूर प्रस्तुत लेखकास merge करावा लागला.
- जुन १चे जून १कडे पुनर्निर्देशन केले असता अशा वाचकाला जुन १च्या दुव्यावरुन तसेच जुन १चा शोध घेताना आपोआप जून १ हे पान सापडेल व नवीन पान तयार करण्याची शक्यता नाहीशी होईल (अर्थात, वाचकाने खोडसाळपणे असे केले असता इलाज नाही!) शिवाय जुन १ कडून पुनर्निर्देशन होउन जून १ वर आले असता पानाच्या वर 'जुन १कडून पुनर्निर्देशित' असा संदेश असतोच, ज्यामुळे वाचकाला बरोबर शुद्धलेखनाचाही बोध होईल. जुन १ व जून १ असे दोन्ही लेख असण्यापेक्षा ही परिस्थिती जास्त सयुक्तिक वाटते.
- असे करणे हे विकिपीडियाच्या मुक्त धोरणामुळे आवश्यक आहे. जर हा ज्ञानकोश कोणालाही संपादित करता आला नसता तर आपण सुचवलेला उपाय (चुकीच्या शुद्धलेखनाचे लेख काढून टाकणे) अगदी बरोबर आहे पण विकिपीडियावर कोणीही नवीन लेख सुरू करू शकतो, त्यामुळे असे (पुनर्निर्देशन) करणे योग्य आहे.
- आता लेखांच्या संख्येबद्दल म्हणलात तर पुनर्निर्देशन करणारे लेख लेखांच्या संख्येत धरले जात नाहीत. उदा. ऑन्री थियेरी या लेखाकडे ७-८ पुनर्निर्देशने आहेत (नावाच्या विविध उच्चार, बरोबर तसेच काहीसे चुकीच्यांनुसार) पण विकिपीडियावरील लेखांची संख्या मोजताना फक्त एकच धरला जातो. किंबहुना, अशी पुनर्निर्देशने असणे ही चांगल्या विकिपीडियाचे लक्षणच धरले जाते. इंग्लिशसह अनेक इतर विकिपीडियांवर हे धोरण राबवले जाते.
- आपल्या सूचना व धोरणविषयक प्रश्नांचे स्वागतच आहे, तरी अजून काही शंका असल्यास कळवावी.
- क.लो.अ.
- अभय नातू ०५:२३, २४ जुलै २००७ (UTC)
नमस्कार,
माझ्या संकल्पाप्रमाणे जानेवारी १ या लेखासाठी १ जानेवारी हा पुनर्निर्देशक असे ग्रेगरी दिनदर्शिकेतील सर्व ३६६ दिवसांसाठी पुनर्निर्देशक लिहून पूर्ण झाले आहेत.
वा! दोन दिवसांत सगळे पुनर्निर्देशक तयार करणे हे सोपे काम नाही!
पुनर्निर्देशनांमुळे विकिप्रणालीवर अवाजवी ताण येत नाही. हे पुनर्निर्देशक वापरले जाईपर्यंत (एखाद्या वाचकाने २ डिसेंबरचा लेख मागेपर्यंत) सुप्त असतात. वाचकाने कोणत्याही शब्दाचा शोध घेतला किंवा विवक्षित दुवा मागवला की प्रणाली प्रथम त्याच नावाचा लेख आहे का हे बघते न सापडल्यास त्या नावाचा पुनर्निर्देशक आहे का हे बघते व त्यानंतर शोध सुरू करते. पुनर्निर्देशक नसतासुद्धा मधली स्टेप असतेच, किंबहुना असे म्हणता येईल की पुनर्निर्देशक असल्यामुळे तिसरी स्टेप वाचते व वाचक व विकिप्रणाली, दोन्हीवरचा ताण कमी होतो.
आता पुढचे कोणते काम हाती घेण्याचा विचार आहे? त्यात काही मदत लागली तर त्यासाठी मी तयार आहेच.
अभय नातू १४:५०, २६ जुलै २००७ (UTC)
साच्यांविषयी
[संपादन]श्रीहरि, साच्यांविषयी तुम्ही चावडीवर विचारलेली शंका वाचली. मला वाटते साच्यातील पॅरामीटरला एखादा आकडा 'व्हॅल्यू' म्हणून दिला तर तो आकडा म्हणूनच घेतला जातो. तुम्हाला कुठे अडचण आली आहे का? --संकल्प द्रविड ०५:१२, २४ जुलै २००७ (UTC)
गौरव
[संपादन]श्रीहरि,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar १२:५७, २९ जुलै २००७ (UTC)
संपर्क
[संपादन]श्रीहरि, आपण मला <REMOVED BY संकल्प द्रविड> आयडीवर ईमेल पाठवाल काय? विकिपीडियाबद्दल काही कल्पनांची देवाणघेवाण करायची आहे.
--संकल्प द्रविड १४:१५, १० ऑगस्ट २००७ (UTC)
- Could you check your email? I have replied you with my mobile phone number. I would prefer a talk now/today late evening.
- --संकल्प द्रविड १०:४४, १३ ऑगस्ट २००७ (UTC)
- Your point is right.. but these days I would be short of time and hence want to spare that time to do some 'real contri' to wiki than writing to fellow wikipedians; that's the reason why I would prefer talking to you(or anybody for that matter). That will help us communicate faster(universal advantage of phonic conversation :P). Of course, I do understand importance of communication going 'on-the-record'. But my currrent situation dictates otherwise.
- Hope to hear from you.
- --संकल्प द्रविड १४:३३, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
पुनः स्वागत
[संपादन]विकिनिद्रेतून परतल्यावर आपले पुनः एकदा स्वागत :-)
अभय नातू ०३:२०, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
वर्ग:अव्यय
[संपादन]Please have look at classification under वर्ग:अव्यय at Marathi Wiktionary, see if you can add or correct any entries wherever whenever possible,your suggestions are welcome.Thanks & Reagards Mahitgar
वर्ष पाने
[संपादन]नमस्कार,
आपण तयार केलेली नवीन (इ.स.) पाने चाळताना माझ्या लक्षात आले की बर्याच पानांच्या ई.स. व इ.स. अशा दोन आवृत्त्या झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी --
१. ई.स.चे पान असल्यास त्यात आपले बदल करावे (वर्षपेटी, इतर मथळे)
२. ई.स.चे पान इ.स. कडे स्थानांतरित करावे.
असे केल्याने ई.स.च्या पानावरील मजकूर (मुख्यत्त्वे आंतरविकि दुवे) अबाधित राहील, ई.स. चे इ.स. कडे आपोआप पुनर्निर्देशन तयार होईल तसेच एकाच वर्षाची दोन पानेही राहणार नाहीत.
यापुढील पानांबाबत असे केलेत तरी चालेल. आतापर्यंतची पाने सावकाश बदलूयात.
अभय नातू ०१:५५, २३ ऑगस्ट २००७ (UTC)
Compliments
[संपादन]- Now you are admin at Marathi Wiktionary. We look forward to your continued support at Marathi Wiktionary.
-Mahitgar
प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण
[संपादन]Please refer प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण for what we have done uptill now User Kolhapuri has played major role in it.Frankly I am aware of the technical aspects as long as changes are made by way of mediawiki interface. But user and admin Kolhapuri has made certain chages which are common to all Marathi wiki wide effecting in same way for marathi wikibooks and marathi wikiquates and marathi wiktionary.प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण and discussion with user kolhapuri might be helpfull to some extant.
as long as Marathi wiktionar varg getting changed back to category is a mystery to me also. May be I will put a query at meta just now for help in this respect.
Thanks and regards
Mahitgar १५:४२, २० सप्टेंबर २००७ (UTC)
year pages
[संपादन]Hi श्रीहरि,
You have done extensive work on year and dates etc. I had this question that say 2006 will be directed to इ.स. २००६, wheather it is possible that we can redirect २००६ pages toइ.स. २००६. It will be useful for me in football worldcup article. If its ok, i will do it for past 50 years.
Maihudon १३:२१, ४ ऑक्टोबर २००७ (UTC)
- २००६ usualy nos are unlikely to have any other application but still certain nos get some significance at time, so to avoid any future confusion personally I am of openion to have disambeguation -nisandigdhikaran pages for all of those you plan to redirectin the way Maihudon has requested.
- Thanks and regards Mahitgar १५:२४, ४ ऑक्टोबर २००७ (UTC)
मराठी विक्शनरीत NavFrame मूळ आकर्षक स्वरूपात येत नाही
[संपादन]http://en.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit
http://mr.wikipedia.org/w/index.php?title=MediaWiki:Common.js&action=edit
माझ्या मते वरची दोन पाने भिन्न असल्या कारणे हे होत आहे
सुभाष राऊत ०४:२९, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
srihari, aata toh farak rahila nahi. abhay natu yaani toh nit kela aahe
--सुभाष राऊत १५:०७, १८ ऑक्टोबर २००७ (UTC)
Adminship
[संपादन]Hello,
I have asked a few questions regarding your request for adminship here. Can you pls answer them?
Regards,
Abhay Natu १७:०१, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)
Re:Adminship
[संपादन]नमस्कार,
नवीन प्रबंधक निवडण्यासाठी साधारणतः विकिपीडियाचे नियम असे आहेत की --
१. आपल्या विकिपीडियावर कौल मागावा. १.१ हा कौल चावडी किंवा तत्सम पानावर मागावा. हा कौल इंग्लिशमध्ये असावा. १.२ कौल मागीतल्यावर ७-१० दिवस (तरी) थांबावे. १.३ कौल देणार्यांचे शंकासमाधान करावे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. २. अनुकूल कौल मिळाल्यावर मेटाविकिवर विनंती करावी. या विनंतीसोबत आपल्याला मिळालेला कौल दाखवणार्या पानाचा दुवा द्यावा. २.१ कौल मागीतल्यावर ७-१० दिवस (तरी) थांबावे. २.२ कौल देणार्यांचे शंकासमाधान करावे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. ३. मेटाविकिवर प्रतिकूल कौल न मिळाल्यास तेथील प्रबंधक (किंवा आपल्या विकिपीडियावरील ब्युरॉक्रॅट) प्रबंधकपद देतील.
तरी अजून ३-४ दिवसांनी मी आपल्या प्रबंधकपदाची विनंती मेटावर करेन. त्यावेळी चावडीवर तेथील दुवाही देईन. माझ्या विनंतीनंतर आपण ते पान पहात रहावे.
अभय नातू ०२:४४, २३ ऑक्टोबर २००७ (UTC)
प्रबंधकपद
[संपादन]श्रीहरी,
मेटाविकिवरील प्रबंधकपदासाठीच्या इतर विनंत्या पाहून असे वाटते आहे की आपणच आपल्या मराठी विकिपीडियावरील प्रबंधकपदासाठी विनंती करणे सयुक्तिक आहे. आपल्या विनंतीला पाठिंबा देण्यास मी तयारच आहे.
विनंती केल्यावर चावडीवर संदेश दिल्यास इतरही सदस्य आपला पाठिंबा मेटाविकिवर नोंदवू शकतील.
अभय नातू १२:४३, ३० ऑक्टोबर २००७ (UTC)
पुनर्रचित वर्गीकरण
[संपादन]I think you currently working on पुनर्रचित वर्गीकरण for year pages, What i suggest is that if these changes are repetative then these chages can be done effectively and with less efforts using bot. I think you can talk to अभय नातू regarding feasibility of using a bot for this purpose
Maihudon ०५:१२, २० नोव्हेंबर २००७ (UTC)
Use of bot to replace categories
[संपादन]Hello,
It is indeed possible to use a bot to replace categories, add categories, etc. One requirement to use a bot (at least the version I have created) for repeatative edits is that the target article set be defined deterministically. For example, all articles within a category, all articles containing a specific word/phrase, all articles linked to a particular page, or even all articles listed in a flat file. There are several other ways to define the target set. The other requirement is that the edit to be performed must be static, e.g. add/replace a word/sentence, category related edits (add/replace/remove) among other things
Let me know if this is along the lines your edits are.
Abhay Natu १६:२८, २० नोव्हेंबर २००७ (UTC)
Hello,
I'm converting Category to वर्ग on articles I edit for other reasons. A bot may be able to do that, however, it is too small a task to run a bot just for that. When I run the bot for other tasks, it automatically applies general fixes such as this.
Any thoughts on the wikipedia contest?
अभय नातू ०९:२६, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)
If a user has provided an email while registering his/her username here, a link will show up on the left pane when visiting that user's talk page. Alternately, you can send an email on the yahoo group. I believe most of the admins are registered there.
अभय नातू ०९:४७, २५ नोव्हेंबर २००७ (UTC)
आणी, आणि
[संपादन]नमस्कार,
आपण सांगितलेला बदल सांगकाम्याकरवी करून घेतला आहे. दिवस पानांवर हाच बदल १-२ दिवसांत करवून घेईन.
अभय नातू ०४:०६, १२ डिसेंबर २००७ (UTC)
सांगकाम्या
[संपादन]नमस्कार,
ही माहिती देण्यात दिरंगाई झाली त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही संदेश दिल्याच्या सुमारास अनेक इतर कामे व संदेश आले, त्यात आपणास लिहायचे राहून गेले व तद्नंतर विसर पडला.
मी आज-उद्या आपणास कळवतो.
अभय नातू ०५:०१, २७ डिसेंबर २००७ (UTC)
Bot
[संपादन]There are many ways wikipedia bots can be created and run. The most popular method seems to be using python scripts. There's an infrastructure/shell application in public domain that most users take and modify. Bots created using this method can edit as well as add new articles.
What I use to create bots is based on AutoWikiBrowser infrastructure written in C#.net. This is also public domain and hosted on sourceforge. It allows me to edit articles but not add them.
I forked a branch from sourceforge cvs a few months ago and made marathi wikipedia specific changes to it. As a result, I do not have the latest version. The code is well-structured and easy to understand for anyone with basic understanding of how dot Net works. I will be happy to share my version if you think it will help.
Abhay Natu १७:३४, २७ डिसेंबर २००७ (UTC)
calculations
[संपादन]It seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).
Maihudon १०:११, १४ जानेवारी २००८ (UTC)
ट्रान्सलेट विकिप्रकल्पात योगदान विनंती
[संपादन]प्रिय विकिपीडियन मीत्रहो,
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
आपला नम्र Mahitgar १७:२१, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
raised a request for adminship
[संपादन]i have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.
सुभाष राऊत (चर्चा • योगदान • संख्या • नोंदी • स्थानांतराची नोंद • रोध यादी • विपत्रपत्ता)
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८
[संपादन]नमस्कार,
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी कोणत्या लेखाची निवड करावी असे आपणास वाटते? माझ्या मनात जर्मनी हा लेख निवडावा असा विचार आहे.
संकेत अंधारीकर २०:२१, १६ मार्च २००८ (UTC)
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]सहाय्य:विस्तार:पृथकककारके
[संपादन]नमस्कार श्रीहरि,
सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.
धन्यवाद Mahitgar ०६:२४, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)
अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी
[संपादन]अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच
त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.
नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.
साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.
- माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)
- बर्याच दिवसांनी इकडे दिसलात , छान वाटले माहितगार ०९:१३, ३ ऑगस्ट २०१० (UTC)
नमस्कार
[संपादन]कृपया माझा सादर नमस्कार स्विकारावा. वि. नरसीकर (चर्चा) १२:५९, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा
[संपादन]नमस्कार,
चावडी ध्येय आणि धोरणे वर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरु आहे. जेष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे भाषा निर्देश आपल्या लेख द्वारे सदर चावडीवर मांडले आहेत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चाविडी ध्येय आणि धोरणे वर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कमी अमुल्य योगदान करावे हि विनंती. राहुल देशमुख ०२:२९, १८ जुलै २०११ (UTC)
- आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.
खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे
[संपादन]mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०५:५८, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
नमस्कार
[संपादन]प्रिय श्रीहरिजी, गेल्या बर्याच महिन्यापासून आपल्याला (कदाचित कार्यबाहुल्यामुळे असेल) पण मराठी विकिपीडिया वर संपादन करण्यास वेळ झालेला दिसत नाही. आपण मराठी विकिपीडियावरील अतिशय चांगले काम करणारे संपादक आणि प्रचालक आहात. आपणास सर्व सदस्यांतर्फे विनंती आहे की आपण पुन्हा वेळात वेळ काढून येथे कार्यरत होवून मराठी विकिपीडियाच्या वाढीस सहाय्य करावे. - Mvkulkarni23 १२:०४, १० जून २०१२ (IST)
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
[संपादन]आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५४, ११ जून २०१२ (IST)
IPs are human too
[संपादन]Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.
Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.
You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)
Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too
Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.
- Common misconceptions
Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.
Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.
Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]
Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.
Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.
Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.
They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.
Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०
[संपादन]Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.
Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.
I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:५१, २३ सप्टेंबर २०१२ (IST)
आपले मत कळवावे
[संपादन]विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.
Mrwiki reforms (चर्चा) ००:४३, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा
[संपादन]नमस्कार,
मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:३१, ९ एप्रिल २०१५ (IST)
प्रचालकपद
[संपादन]नमस्कार श्रीहरि,
तुम्ही विकिमीडिया प्रकल्पांवर अद्याप कार्यरत आहात का?
मराठी विकिपीडियावर तुमचे शेवटचे संपादन डिसेंबर २००७मध्ये झालेले दिसते. तुम्ही तेथे प्रचालक आहात व संकेतांनुसार तुमचे प्रचालकपद रद्द होण्यास पात्र आहे. तुम्ही हे कायम ठेवू इच्छित असाल तर टाकोटाक संपर्क साधावा ही विनंती.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०८:००, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
[संपादन]श्रीहरि,
आपणास या नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आनंद मिळवा. विकिपीडियावरील आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.
धर्माध्यक्ष (चर्चा) ११:५९, १ जानेवारी २०२० (IST)
सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.