नोर-पा-द-कॅले
नोर-पा-द-कॅले Nord-Pas-de-Calais | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
नोर-पा-द-कॅलेचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | लील | ||
क्षेत्रफळ | १२,४१४ चौ. किमी (४,७९३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४०,३३,१९७ | ||
घनता | ३२५ /चौ. किमी (८४० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-O | ||
संकेतस्थळ | http://www.nordpasdecalais.fr/ |
नोर-पा-द-कॅले (मराठी लेखनभेद: नॉर-पा-द-कॅले ; फ्रेंच: Nord-Pas-de-Calais ) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर व बेल्जियम देशाच्या सीमेवर वसला आहे. लील ही नोर-पा-द-कॅलेची राजधानी व सर्वांत मोठे शहर तर कॅले हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नोर-पा-द-कॅले हा फ्रान्समधील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा प्रदेश आहे. इंग्लंडमधील डोव्हर हे गाव इंग्लिश खाडीच्या पलीकडे कॅलेपासून केवळ ३४ किमी अंतरावर वसले असून ही दोन शहरे चॅनल टनेलद्वारे जोडली गेली आहेत. चॅनल टनेलमुळे ह्या प्रदेशामधील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
२०१६ साली पिकार्दी व नोर-पा-द-कॅले ह्या दोन प्रदेशांचे एकत्रीकरण करून ऑत-दा-फ्रान्स हा नवा प्रशासकीय प्रदेश बनवण्यात आला.
विभाग
[संपादन]नोर-पा-द-कॅले प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2015-07-21 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |