अबु धाबी
अबुधाबी أبو ظبي |
||
संयुक्त अरब अमिराती देशाची राजधानी | ||
| ||
देश | संयुक्त अरब अमिराती | |
क्षेत्रफळ | ६७,३४० चौ. किमी (२६,००० चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ९,४५,२६८ | |
- घनता | २९४ /चौ. किमी (७६० /चौ. मैल) | |
http://www.abudhabi.ae |
अबुधाबी (देवनागरी लेखनभेद: अबु धाबी, अबू धाबी; अरबी: أبو ظبي ; आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप लेखन: Abū ẓabī ; शब्दशः अर्थ: हरणाचा पिता[१]) ही संयुक्त अरब अमिराती या पश्चिम आशियातील देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यभागात, पश्चिम किनाऱ्यावर इराणाच्या आखातात उभ्या असलेल्या एका बेटावर अबुधाबी वसले आहे. शहराचे क्षेत्रफळ ६७,३४० वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे ८,६०,००० (इ.स. २००८)[२] आहे.
संयुक्त अरब अमिरातींची राजधानी येथे असल्याने संघशासनाची महत्त्वाची कार्यालये व संस्था अबुधाबीत आहेत. अमिरातींच्या राजघराण्याचे वास्त्यव्यही अबुधाबीतच आहे. वेगाने झालेला नागरी सुविधांचा विकास व अबुधाबीकरांच्या सरासरी दरडोई उत्पन्नाची उच्च पातळी यामुळे ते प्रगत महानगर बनले आहे. अमिरातींमधील नाना तऱ्हांच्या व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे ते केंद्र आहे. अबुधाबी सिक्युरिटी बाजार, संयुक्त अरब अमिराती केंद्रीय बँक या महत्त्वाच्या वित्तीय संस्था येथेच असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालयेही येथे आहेत. इ.स. २००८ साली संयुक्त अरब अमिरातींच्या सकल वार्षिक उत्पन्नात अबुधाबीचा वाटा ५६.७ %, इतका मोठा होता [३][४].
संदर्भ
- ^ "द सिक्रेट ऑफ लाइव्ह नेम्स". २३ ऑगस्ट, इ.स. २००८ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) (इंग्लिश मजकूर) - ^ संयुक्त अरब अमिराती: मोठी शहरे, गावे आणि त्यांच्या लोकसंख्येविषयीची सांख्यिकी Archived 2013-07-23 at the Wayback Machine.. वर्ल्ड गॅझेटियर (इंग्लिश मजकूर).
- ^ गल्फन्यूज: दुबई कॉंट्रिब्यूट्स मोर दॅन ३०% ऑफ द यू.ए.ई. इकोनॉमी (इंग्लिश मजकूर) . आर्काइव.गल्फन्यूज.कॉम (१६ जून इ.स. २००९). १६ जुलै इ.स. २००९ रोजी मिळवले.
- ^ गल्फन्यूज: अबुधाबी ॲंड दुबई लीड्स इन कॉंटिब्यूशन्स तो जीडीपी Archived 2011-09-02 at the Wayback Machine.. वेब.डीसीसीआइअ.एई. १६ जुलै इ.स. २००९ रोजी मिळवले. (इंग्लिश मजकूर).
बाह्य दुवे
- अबुधाबी महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-09-14 at the Wayback Machine. (अरबी मजकूर)
- विकिव्हॉयेज वरील विकिट्रॅव्हलावरील माहिती पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकूर)