• हा विश्वकोश कोणकोणत्या मार्गाने वाचता/चाळता येतो हे लक्षात यावे यासाठी हा लेख आहे.
  • आपल्याला लेखांचे स्वतः संपादन करावयाचे असल्यास सहाय्य:संपादन येथे अधिक मदत उपलब्ध आहे.
  • आपली विकिपीडियाला ही पहिलीच भेट असेल तर कदाचित आपल्याला विकिपीडियाची ओळख करून घेणे आवडेल.
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर या जयंती पासून या वर्षी १५ ऑक्टोबर हा 'वाचन प्रेरणा दिन आणि पुढे २२ ऑक्टोबर पर्यंत वाचन सप्ताह साजरा करण्याचा मानस आहे. आपल्या कल्पना विकिपीडिया चर्चा:सफर पानावर मांडण्याचे आवाहन आहे.


माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम कलाम यांच्या जयंती निमित्त
मराठी विकिपीडिया वाचन प्रेरणा सप्ताह - २०१५ साठी समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक अभिनंदन!
ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा दिवस। म्हणून साजरा करूया।।

 • आपल्याला माहित आहे का ? :

 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर


विश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त (मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्यांसह) शक्य तेथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ रितीने आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो. (येथे वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)

आपण येथे केवळ वाचण्याकरिता किंवा चाळण्याकरिता आला असाल तर अपूर्ण लेखांवर पोह्चून होणारा हिरमोड शक्य तेवढा कमी होण्याच्या दृष्टीने खालील विविध मार्गांनी आपण विकिपीडियाची सफर करू शकता.

विकिपीडिया वाचण्याचे काही मार्ग असे

  • किमान विशेष दर्जा असलेले लेख वाचावयाचे असतील तर दालन:विशेष लेखनकडे जा.
  • मोठे अधिक लांबीचे लेख वाचण्याकरिता विशेष:मोठी_पाने येथे जा.
  • येथे सर्वाधिक बदललेले लेख पाहा.
  • जुने लेख येथे चाळा.
  • विशिष्ट लेखांच्या शोधासाठी पानात वर उजवीकडे शोध शब्दपेटी आहे. तिथे शब्द लिहून लेख शोधा. संबंधित अक्षर किंवा शब्दापासून उपलब्ध लेखांच्या नावांची यादी शक्यतो आपण अक्षर/शब्द लिहिताच दिसू लागते. त्यातील पसंतीच्या लेखावर टिचकी मारून तो वाचण्यासाठी उघडा.
  • लेखात किवा अन्यत्र जागोजाग असलेले दुवे वापरून एका लेखातून दुसरा लेख उघडता येतो.
  • विशिष्ट विषयाचा वर्ग (गट) अनुसरूनही वाचन करू शकता. लेखाखाली असलेल्या वर्गीकरणातून किंवा वर्गवारी वापरून लेख वाचा.
  • डावीकडील स्तंभात साधनपेटीत दिलेल्या या पृष्ठासंबधीचे बदल येथे टिचकवले असता केवळ त्या पानातीलच नव्हे तर ते पान इतर ज्या कोणत्या पानास जोडलेले आहे त्या सर्व पानातील अलीकडचे बदल पहावयास मिळतात.याचा उपयोग एखाद्या विषय वर्ग पानास त्या वर्गातील सर्व पाने जोडलेली असल्या मुळे विषय गटानुसार नवीन काय वाचावयास मिळते का याचाही शोध घेता येतो.
  • हा विश्वकोश नुसता चाळायचा आहे? काय वाचायचे ठरलेले नाही ? डावीकडच्या स्तंभात अविशिष्ट लेखवर टिचकी द्या.
  • विकिपीडियातील लेखांमध्ये झालेले ताजे बदल पाहण्यासाठी डावीकडच्या स्तंभात (सुचालनामध्ये) अलीकडील बदल पाहा.
  • विशेष पृष्ठे पाहण्यासाठी साधनपेटीमध्ये विशेष पृष्ठे यावर टिचकी मारा.
  • ज्या पृष्ठांकडून ह्या पृष्ठाकडे दुवे आहेत, अशी पाने शोधा. त्यासाठी डावीकडच्या साधनपेटीमध्ये येथे काय जोडले आहे यावर टिचकी मारा. अजून लिहून न झालेल्या पानांवरही ही सुविधा उपलब्ध आहे. (ज्या पृष्ठांना खूप दुवे आहेत ती लिहीण्याची जरूरी आहे हे समजेल.) ज्या पृष्ठांचे अजून संपादन व्हायचे आहे त्या पानांवरही ‍‍ही सुविधा उपलब्ध आहे. येथे काय जोडले आहे हे सुद्धा पाहा.
  • फक्त चित्रे पहायची असतील तर येथे चित्र यादी पहा.

वाचकांचा सहभाग

संपादन

विकिपीडिया कुणीही संपादित करू शकेल असा विश्वकोश आहे. आपणही यात माहितीची भर घालू शकता किंवा उपलब्ध माहिती अधिक सुधारण्यासाठी मदत करू शकता. त्यासाठी प्रथम संबंधित पानावर संपादन या कळीवर टिचकी द्यावी लागेल, त्यानंतर मजकूरात बदल करता येईल. मात्र, आपण विकिपीडियाचे सदस्य म्हणून प्रवेश (लॉग इन) केला नसेल, तर आपण ज्या संगणकावरून संपादन करू पाहात आहात त्याचा अंकपत्ता (आय.पी. अॅड्रेस) त्या पानाच्या संपादन इतिहासात नोंदला जाईल, हे कृपया लक्षात घ्या. आपण विकिपीडियाचे सदस्यत्व घेतले असेल आणि सदस्य म्हणून प्रवेश (लॉग इन) केल्यानंतर संपादन केले तर आपले सदस्यनाम आणि संपादनाचा दिनांक, वेळ आदी माहितीची नोंद त्या पानाच्या इतिहासात होते.

विकिपीडियावर तुम्हालाही करण्याजोग्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी करण्याजोग्या गोष्टी येथे टिचकी द्या

सदस्यांसाठी सुविधा

संपादन

कुणीही विकिपीडियाचे सदस्य होऊ शकतो. सदस्यत्व मोफत आहे. वाचन करताना माहितीची भर घालणे, एखाद्या संबंधित गोष्टींकडे लक्ष वेधणे, लेख सुधारण्यास मदत करणे किंवा अधिक माहितीची भर घालणे अशा विविध कारणांसाठी या सुविधा वापरता येतात. सदस्यांसाठी उपलब्ध सुविधांपैकी काही अशा -

  • सोपे सदस्यचौकट साचे स्वतःच्या सदस्य पानावर लावून स्वतः बद्दल अधिक माहिती नोंदवू शकता.
  • आपल्या आवडीचे लेख आणि ज्या लेखाच्या बदलांवर लक्ष ठेवायचे असेल ते तुमच्या निरीक्षण सूचीत नोंदवून ठेवा.
  • आपण केलेल्या लेखांच्या संपादनांची यादी आपल्याला माझे योगदान याखाली पहायला मिळेल
  • एखाद्या लेखाचे वाचन करताना काही मुद्दे तुम्हाला नोंदवायचे असतील तर त्या संबधीत लेखाच्या चर्चा पानावर नोंदवा.
  • अधिक संपादकांचे लक्ष्य वेधायचे असल्यास मुद्दा विकिपीडिया:चावडी वर नोंदवा.
  • आपण सदस्य खाते ऊघडून प्रवेश केला असेल तर माझ्या पसंती विभागात आपल्याला विकिपीडियाचा दृश्य पेहराव त्वचा (appearance) आपल्या आवडी प्रमाणे निवडता येते.

सुधारणेस हातभार

संपादन

नवी लेखांची पाने तयार करणे किंवा असलेल्या पानांत नव्या मजकूराची भर घालणे याखेरीज पुढील काही पद्धतींनीही आपण वाचन करतानाच मजकूर सुधारण्यास हातभार लावू शकता --

  • एखाद्या लेखातील एखादे वाक्य/शब्द क्लिष्ट वाटले तर संबंधित शब्दानंतर {{क्लिष्टभाषा}} असे लिहा ते [सोप्या शब्दात लिहा] असे दिसेल.
  • एखाद्या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्यायी शब्द पहावयाचा असेल, तर ऑनलाइन शब्दकोश यादी वरून सुयोग्य शब्दकोश संकेतस्थळ निवडा.
  • विकिपीडियात असावी असे वाटणारी माहिती द्यावी याकरिता संबंधित लेखपानाच्या चर्चा पानावर {{हवे}} असे लिहून विनंती करू शकता [लेख/माहिती हवी] अथवा आपली विंनंती करण्याजोग्या गोष्टी येथे सुयोग्य पानावर नोंदवा.
  • एखाद्या लेखात काही रोचक किंवा लक्षवेधक माहिती आढळली जी की इतरांना माहिती व्हावी, असे वाटले तर लक्षवेधक माहिती प्रकल्पात सहभाग घ्या.
  • संपूर्ण लेखच आवडला असेल तर मुखपृष्ठ सदराकरिता संबधीत लेखाचे नामनिर्देशन करा.
  • एखाद्या लेखाचे मागचे बदल कुणी आणि केव्हा केले आहेत ते त्या लेखाचा इतिहास पाहून लक्षात येते.
  • पानाच्या छपाईकरिता तसेच इतरत्र संदर्भ उधृत करण्याकरिता डावीकडील साधनपेटीत सुविधा दुवे उपलब्ध असतात.
  • संपूर्ण लेखाच्या अभिप्राय/मूल्यांकन/समसमीक्षणाची(peer review) चीसुद्धा मराठी विकिपीडियास मोठी आवश्यकता आहे.

पहारा, गस्त आणि साह्य

संपादन

खरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे साह्य या गोष्टींत करतात. अर्थात हा पहारा, गस्त किंवा साह्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते. बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्‍याची सूचीत समाविष्ट करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात. त्याहीपेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चुका दुरुस्त करून अथवा परतवून वेळेवरच योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे सदस्य विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषांतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पाहतात तसेच इतर विविध प्रकल्पांतही गस्त घालत मार्गक्रमण करतात.

गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंद करतात.

तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात. एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते.

अनेक अनुभवी संपादक सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात.

चर्चा आणि विवाद

संपादन

विकिपीडीयावर बर्‍याच विषयांवर मतमतांतरे असतात.याच लेखाच्या नावातील "सफर" या शब्दावर अथवा सुचवले गेलेल्या पर्यायी शब्दांवर अद्याप कोणतेही एकमत झालेले नाही. अधिक विषय पाहण्यासाठीविवाद्य लेखांना/चर्चेला भेट द्या किंवा मुख्य नामविश्वातील कोणतेही चर्चा विषय हाताळा अथवा मराठी विकिपीडियाचे मध्यवर्ती चर्चापानास भेट द्या.सदस्यांच्या आपापसातील ताज्या चर्चायेथे पहा.

मराठी विकिपीडिया विकिपीडियाची वैगुण्ये लेखात आपण विकिपीडीयाच्या वैगुण्यांची नोंद करण्याचे स्वागत करते.

विकिपीडीयाबद्दल इतरांनाही सांगायचेय

संपादन

मराठी विकिपीडिया जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही ह्या बद्दल सांगा. तुम्ही विकिपीडिया: इतरांनाही सांगायचेय येथे तुम्हाला मदत करणारी सामग्री उपलब्ध केली आहे.

लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग

संपादन

दुव्यांचा उपयोग करून खालील यादीचा साचा बनवण्यात सहकार्य करा.

  • विकिपीडिया कॅटेगरी हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा

विकिपीडियाचे वाचन, इतरत्र संदर्भ देताना आणि संशोधन करताना घ्यावयाची काळजी

संपादन
विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते.त्यामुळे आपल्यला व्यक्तीगत पातळीवर न पटणार्‍या दृष्टीकोनांची मांडणीसुद्धा विकिपीडियावर असू शकते.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत राहतात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता ,विवाद्य मजकुराबद्दल दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात व चर्चा पानावर परस्पर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. आपली वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी, स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.
विकिपीडिया सर्व विषयांवर लिहिण्यास सर्वांना सर्वकाळ मुक्त आहे. साधारणतः येथील लेखन माहितीपूर्ण आणि संदर्भासहित असणे अभिप्रेत असते. माहितीच्या प्रगल्भतेवर विकिपीडियात माहितीचे कोणतेही प्रतिबंधन केले जात नाही, विकिपीडीया सर्व वाचकांच्या आणि संपादकांच्या विवेकावर -निरपवाद- विश्वास ठेवते, काही वेळा प्रगल्भ विषयांवरील लेखन विकिपीडियावर असू शकते.सर्व लेखनाचे समसमीक्षण झालेलेच असेल असे खात्रीने सांगता येत नाही.
हे लक्षात घ्या की विकिपीडियाच्या आवाक्यास/परिघास काही मर्यादा आहेत. त्याबद्दल विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि .विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार साह्य पानांतून अधिक माहिती घ्या.
  • विकिपीडिया समाज काय नाही.
    • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. येथे कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
    • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात
    • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
    • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.

हेसुद्धा पहा

संपादन

विकिपीडिया:सफर/तुम्ही काय करू शकता विभाग

विकिपीडियाचे सहप्रकल्प

संपादन

विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: