सोशल मीडियामुळे असा निकामी होतोय तुमचा मेंदू, पाहा व्हीडिओ
सोशल मीडियामुळे असा निकामी होतोय तुमचा मेंदू, पाहा व्हीडिओ
इन्स्टाग्राम रील्स किंवा युट्यूब शॉर्ट्स स्क्रोल करत तासन् तास घालवायची सवय असेल तर कदाचित तुमचा Brain Rot होतही असेल. म्हणूनच हा Word Of The Year असल्याचं Oxford ने जाहीर केलंय. या शब्दाचा अर्थ होतो - सोशल मीडियावरचा सुमार दर्जाचा काँटेट प्रचंड प्रमाणात पाहिल्याने मेंदूवर होणारा परिणाम.
मेंदू सडणं...म्हणजे एकप्रकारे मेंदूची क्षमता - बुद्धिमता योग्य चालना न मिळाल्याने कमी होणं. 2023 - 2024 या काळात या शब्दाचा वापर करण्याचं प्रमाण 230% वाढल्याचं ऑक्सफर्डने म्हटलंय.
सोशल मीडियावर रील्स - शॉर्ट्स पाहत राहिल्याने आणि त्यानंतर मेंदूत काय होतं? त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतोय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले