प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? सोपी गोष्ट
प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? सोपी गोष्ट

प्लास्टिक ही गोष्ट अचंबित करणारी आहे. म्हणजे, या प्लास्टिकमुळे जगभरात ताजं अन्नं एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवलं जाऊ शकतं. हे प्लास्टिक आपल्याला ऊब देतं.. किंवा थंड ठेवतं..पावसापासून कोरडं ठेवतं.

लशी - औषधांची मोठ्या प्रमाणात अब्जावधी लोकांसाठी जगाच्या एका टोकापासून दुसरीकडे सुरक्षित वाहतूकही प्लास्टिकमुळे शक्य होते. पण जसे फायदे तसे तोटे...

याच प्लास्टिकचं आपल्या मातीतलं - आपल्या समुद्रांमधलं - अगदी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि माशांच्या पोटातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आता पृथ्वीवर असलेल्या जमिनीवरच्या आणि समुद्रातल्या सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त वजनाचं प्लास्टिक सध्या पृथ्वीवर आहे. मग प्लास्टिकची ही जागतिक समस्या सोडवता येईल का... आणि कशी?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये