राखी चिखल्या
Appearance
राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो.
वितरण
[संपादन]हे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते.
निवासस्थाने
[संपादन]ते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात.
चित्रदालन
[संपादन]संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.