जेनोवा
Appearance
जेनोवा Genova |
|||
इटलीमधील शहर | |||
| |||
देश | इटली | ||
प्रदेश | लिगुरिया | ||
क्षेत्रफळ | २४३.६० चौ. किमी (९४.०५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ६६ फूट (२० मी) | ||
लोकसंख्या (डिसेंबर २०१२) | |||
- शहर | ६,०६,६५३ | ||
- घनता | २,४९०.७७ /चौ. किमी (६,४५१.१ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.comune.genova.it |
जेनोवा (इटालियन: Genova) ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदर व युरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
क्रिस्तोफर कोलंबसचे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवडले गेले.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारे जेनोवा सी.एफ.सी. व यू.सी. संपदोरिया हे दोन क्लब येथेच स्थित आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- क्रिस्तोफर कोलंबस
- पोप इनोसंट चौथा
- पोप एड्रियान पाचवा
- पोप बेनेडिक्ट पंधरावा
- ज्युझेप्पे माझ्झिनी
- निकोलो पागानिनी
- रिकार्दो जियाकोनी
जुळी शहरे
[संपादन]खालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:[१]
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2012-12-30 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |