Jump to content

ग्वानाहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्वानाहा हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ७० किमी उत्तरेस व इस्ला रोआतानपासून १२ किमी अंतरावर असलेले हे बेट इस्लास देला बाहिया प्रांतातील मोठे बेट आहे.

येथे राहणारे सुमारे १०,००० लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारीचा आहे. १९९८ साली आलेल्या हरिकेन मिच या वादळात ग्वानाहावरील जवळपास सगळ्या इमारती कोसळल्या होत्या. दोन दिवस झोडपले गेल्यावर बेटावरील पाइनचे जंगलच नव्हे तर खाजणातील झाडेही जमीनदोस्त झाले होते.

क्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरी दरम्यान १५०२ साली या बेटावर आला होता.