ओल्या वेळूची बासरी (ललित लेखसंग्रह)
Appearance
ओल्या वेळूची बासरी हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा सातवा ललित लेखसंग्रह आहे. इ. स. २०१२ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
[संपादन]वेगवेगळ्या कारणांसाठी ग्रेस यांनी हा संग्रह शहामृगास आणि कस्तुरीमृगास अर्पण केलेला आहे.
परिचय
[संपादन]या संग्रहात एकूण १७ ललित लेख आणि 'हॉस्पिटलमधील स्वगताची पत्रलिपी' या शीर्षकाचा एक पत्ररूपी लेख समाविष्ट आहे. अखेरचे सहा ललित लेख 'बासरीच्या अनुबंधाचे परिशिष्ट' या विभागात आहेत. इतर अकरा लेखांच्या विभागाचे वेगळे शीर्षक आढळत नाही. ग्रेस यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये अभावानेच आढळणाऱ्या मुद्रणातील चुका या संग्रहात मात्र तुलनेने जास्त आहेत.