जॉन वुड्रॉफ
Appearance
सर जॉन वुड्रॉफ | |
---|---|
जन्म |
१५ डिसेंबर १८६५ कलकत्ता, भारत |
मृत्यू |
१६ जानेवारी १९३६ (वय ७०) फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
टोपणनावे | अार्थर ॲव्हलॉन |
नागरिकत्व | इंग्लंड |
पेशा | वकील |
प्रसिद्ध कामे | द सर्पन्ट पावर |
वडील | जेम्स टिस्डाल वुड्रॉफ |
आई | फ्लॉरेन्स वुड्रॉफ |
सर जॉन जॉर्ज वुड्रॉफ (१५ डिसेंबर १८६५ - १६ जानेवारी १९३६) हे ब्रिटिश भारतविद होते. आर्थर ॲव्हलॉन या टोपणनावाने त्यांनी तंत्रशास्त्र व अन्य हिंदू परंपरांवर विस्तृत लेखन केलेले आहे. त्यांच्या लेखनामुळे पाश्चात्य जगात हिंदू तत्त्वज्ञान व योग यांबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली.
द सर्पन्ट पावर
[संपादन]वुड्रॉफ यांचे हे पुस्तक म्हणजे पूर्णानंद (इस सु. १५५०) यांच्या षट्चक्र-निरुपण (सहा दैहिक केंद्रांचे / चक्रांचे वर्णन) व पादुका-पंचक या लेखनकृतींचा अनुवाद व त्यावरील उत्कृष्ट टीका आहे. “सर्पन्ट पावर” (सर्पशक्ती) या संज्ञेने कुंडलिनीचा निर्देश केला गेला अाहे. ध्यान अाणि योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये जी ऊर्जा जागृत होते तिला कुंडलिनी मानले जाते.
पुस्तके
[संपादन]- इंट्रडक्शन टू द तंत्र शास्त्रा
- तंत्रा अॉफ द ग्रेट लिबरेशन (महानिर्वाण तंत्रा)
- हिम्न्स टू द गॉडेस
- शक्ती अँड शाक्ता
- द सर्पन्ट पावर
- द वर्ल््ड ॲज पावर
- द गार्लॅंड अॉफ लेटर्स