जोहोर (भासा मलेशिया: Johor; जावी लिपी: جوهر ; चिनी: 柔佛州 ; तमिळ: ஒஹொரெ ; सन्मान्य नाव: दारुल ताझिम (प्रतिष्ठेचा प्रदेश); ) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिणेस वसले आहे. मलेशियातील सर्वाधिक पुढारलेल्या राज्यांपैकी ते एक आहे. जोहाराची राजधानी जोहोर बारू (पूर्वीचे नाव 'तांजोंग पुत्री') येथे आहे. जोहोराच्या उत्तरेस पाहांग, वायव्येस मलाक्कानगरी संबिलान असून दक्षिणेस सिंगापुराच्या प्रजासत्ताकापासून जोहोरास अलग करणारी जोहोराची सामुद्रधुनी आहे.

जोहोर
Johor
柔佛州
ஒஹொரெ
मलेशियाचे राज्य
ध्वज

जोहोरचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
जोहोरचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी जोहोर बारू
क्षेत्रफळ १९,९८४ चौ. किमी (७,७१६ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,८५,०००
घनता १६९.४ /चौ. किमी (४३९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-01
संकेतस्थळ http://www.johor.gov.my/

भूगोल

संपादन

१९,९८४ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ आणि ३३,००,००० लोकसंख्या (इ.स. २००९ अंदाज) असलेले जोहोर मलेशियाच्या संघातील ५ व्या आकारमानाचे व लोकसंख्येनुसार ३ ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेच्या आकडेवारीनुसार २७,५०,००० लोकसंख्येपैकी ५४ % लोक मलय, ३५ % चिनी, ७ % भारतीय, तर ४ % अन्य वंशीय होते.

जोहोरास पूर्वेस व पश्चिमेस प्रत्येकी ४०० कि.मी. लांबीच्या सागरी किनारपट्ट्या आहेत. १२७६ मी. उंची असलेले गुनुंग लदांग हे पर्वतशिखर जोहोरातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे.

हवामान

संपादन

जोहोर द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिणतम टोकास १° २०' उ. ते २° ३५' उ. अक्षांशांदरम्यान वसले आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनप्रदेशांसारखे हवामान लाभलेल्या जोहोरात दक्षिण चीन समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दर वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांदरम्यान जोहोरात मोसमी पाऊस बरसतो. तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १७७८ मि.मी. आहे. सरासरी तापमान २५.५ °सेल्सि. व २७.८ °सेल्सि. यांदरम्यान असून आर्द्रता ८२ % ते ८६ % यांदरम्यान असते.

शासन, प्रशासन व राजकारण

संपादन

राजतंत्र

संपादन

जोहोर घटनात्मक राजतंत्र आहे. इ.स. १८९५ साली सुलतान अबू बाकर याने स्वीकारलेल्या उंदांग उंदांग तुबू नगरी जोहोर या राज्यघटनेनुसार जोहोर मलेशियातील घटनात्मक राजतंत्र व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य बनले. जोहोराच्या राज्यघटनेनुसार सुलतान जोहोराचा शासनप्रमुख असतो. वंशपरंपरागत पद्धतीने जोहोराच्या राजघराण्यातील सुलतान अबू बाकराचे वंशजच सुलतानपदी आरूढ होऊ शकतात.

शासनयंत्रणा

संपादन

जोहोर राज्य विधिमंडळ ही शासनयंत्रणेची वैधानिक असून त्याचे सदस्य दर पाच वर्षांनी घडणाऱ्या सार्वजनिक निवडणुकींतून निवडले जातात. राज्यशासनाच्या कार्यकारी प्रमुखास मंत्री बसार, अर्थात मुख्यमंत्री, असे म्हणतात. मंत्री बसारास दहा जणांची कार्यकारी परिषद दैनंदिन शासकीय कारभारात मदत करते.

राजकीय विभाग

संपादन
 
जोहोरातील जिल्हे (मजकूर लिपी: रोमन)

राजकीय दृष्ट्या जोहोराचे खालील जिल्ह्यांमध्ये विभाजन होते.

क्र. नाव लोकसंख्या (इ.स. २००९) क्षेत्रफळ (वर्ग कि.मी.)
जोहोर बारू २७,७४,७७८ १८१७.८
बातू पाहात ५,१९,८०० १८७८
मुआर ५,१०,३७६ २३४६.१२
क्लुआंग ३,९४,८०० २८५१.८
कोटा टिंगी २,७९,६०० ३४८८.७
सगामात २,८७,४०० २८५१.२६
पोंतियान २,०८,०५० ९१९.५
मर्सिंग १,०७,४०० २८३८.६
कुलाइजाया २,७५,१०५ ७५३.४५
१० लदांग १,५५,९७८ ९७०.२४

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत