Jump to content

नूडल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चायनीज नूडल्स आणि भात

नूडल्स हा एक खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या पिठाचा गोळा करून त्याला शेवयांचा आकार देऊन नूडल्स तयार केल्या जातत. हा जगभरातील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. नूडल्स पासून विविध पाककृती तयार केल्या जातात. प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, इटली येथील नूडल्स प्रसिद्ध आहेत. या देशांमध्ये प्रमुख भोजनात नूडल्सच्या पाककृती सेवन केल्या जातात.[]

वापरण्याच्या पद्धती

[संपादन]

नूडल्स या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्या जातात. शिजविण्याची प्रक्रिया करताना त्यात मीठतेल घातले जाते. नंतर त्या चाळणीवर काढून घेऊन त्यावर गार पाणी वा बर्फ़ाचे पाणी ओतले जाते. यामुळे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि नूडल्स मोकळ्या व्हायला मदत होते. यानंतर शिजलेल्या तयार नूडल्स वापरून विविध पाककृती केल्या जातात.[]

व्युत्पत्ती

[संपादन]

जर्मन शब्द नुडेल यावरून नूडल्स हा शब्द प्रचारात आला असे मानले जाते.

इतिहास

[संपादन]

हान साम्राज्याच्या काळात नूडल्स या मानवी भोजनातील प्रमुख आहार होत्या असे ग्रांथिक विवेचन आढळून येते. चीन मध्ये सुमारी ४,००० वर्षे प्राचीन असा नूडल्सचा यासंदर्भात सापडतो.यासाठी पुरातत्त्वीय उखनानांचा पुरावा दिला जातो.[]मिलेट या धान्यापासून तयार केलेल्या नूडल्स या उत्खननात सापडल्या आहेत. आधुनिक काळात नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध बदल चिडून येतात.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Yagihashi, Takashi; Salat, Harris (2011-06-22). Takashi's Noodles: [A Cookbook] (इंग्रजी भाषेत). Clarkson Potter/Ten Speed. ISBN 978-1-60774-201-2.
  2. ^ Dalal, Tarla (2007-05-31). Noodles (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-89491-53-6.
  3. ^ Lin-Liu, Jen (2013-07-25). On the Noodle Road: From Beijing to Rome, with Love and Pasta (इंग्रजी भाषेत). Penguin Publishing Group. ISBN 978-1-101-61619-2.