Jump to content

होम्स धूमकेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

17/p होम्स हा सूर्यमालेला ठराविक काळाने भेट देणारा धूमकेतू आहे. याचा शोध ब्रिटिश हौशी खगोलवैज्ञानिक एड्वीन होम्स याने नोव्हेंबर ६, इ.स. १८९२ साली लावला. ऑक्टोबर २००७ मध्ये, अवघ्या ४२ तासाच्या कालावधीत त्याची महत्ता १७ (बऱ्याचशा दुर्बीणींतूनही अदृश्य)पासून २.८ (नुसत्या डोळ्यांना कुठल्याही ठिकाणाहून दृश्य) एवढी वाढली.

शोध

नोव्हेंबर १०, १८९२, अँड्रोमेडा दीर्घिकेजवळ

एड्वीन होम्स याला नोव्हेंबर ६, इ.स. १८९२ या दिवशी नेहेमीप्रमाणे अँड्रोमेडा दीर्घिकेची काही निरीक्षणे घेत असताना१७/पी होम्स हा धूमकेतू सापडला. १८९२ मधीला हा शोध त्यावेळी एकदम वाढलेल्या महत्तेमुळे लागला. १७/पी होम्सची महत्ता ४ ते ५ पर्यंत वाढून नंतर काही आठवड्यांच्या कालावधीत अदृश्य बनला.[]

या शोधाला एडवर्ड वॉल्टर माँडर (रॉयल ऑब्झर्वेटरी, ग्रीनवीच), विलीयम हेन्री मॉ आणि किड यांनी दुजोरा दिला तसेच, थॉमस डेवीड अँडरसन एडीनबर्ग, स्कॉटलँड]] व जॉन एवन डेवीडसन (मॅके, क्वीन्स्लँड, ऑस्ट्रेलिया ) यांनी स्वतंत्रपणे शोध लावला.[]

धूमकेतुच्या लंबाकार कक्षांचे मोजमाप हेन्रीच क्रुत्झ आणि जॉर्ज मेरी सर्ल यांनी स्वतंत्रपणे केले. आणि त्याच्या वारंवारतेचा काल ६.९ वर्षे ठरवण्यात आला. त्यातुन हे सिद्ध झाले की हा धूमकेतू ३डी/बिएलातुन आलेला नाही.

१८९९ आणि १९०६ मध्ये त्याच्या आगमनाची नोंद करण्यात आली पण त्यानंतर १९६४ पर्यंत कुठेही नोंद करण्यात आली नाही. जुलै १६, इ.स. १९६४ला एलिझाबेथ रोएमर यु.एस. नॅवल ऑब्झर्वेटरी, फ्लॅगस्टाफ यांनी त्याची नोंद केली. तेव्हापासून प्रत्येक वेळी त्याचे निरीक्षण करण्यात आले आहे.

२००७चा स्फोट

ऑक्टोबर २५ या दिवशी पर्सियस तारकासमूहातील नवीन ताऱ्याप्रमाणे दिसत होता.

ऑक्टोबर २३-२४ या कालावधीत होम्स धूमकेतू एकदम दैदीप्यमान बनला.[][] मोठ्या दुर्बीणींतून धूमकेतूप्रमाणे दिसत असलातरी ऑक्टोबर २६ पर्यंत डोळ्याने तो एका ताऱ्यासारखा वाटत होता. धूमकेतुच्या स्फोटाच्यावेळी त्याचे शेपूट पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असल्याने पृथ्वीवरून तो एका दिपमान गोळ्याप्रमाणे दिसत होता.

संदर्भ

  1. ^ Editors. "Comet Holmes Stays Bright, Enlarges in the Evening Sky", Sky and Telescope, 27 October 2007. Retrieved 29 October 2007.
  2. ^ Davidson, J. E. "Comet e, 1889," The Observatory, July 1890, Vol. 13, pp. 247. Retrieved 27 October 2007.
  3. ^ Gunn, Angela. "Flash News Flash!," USA Today Tech Space, 24 October 2007. Retrieved 25 October 2007.
  4. ^ Roger W. Sinnott (October 24, 2007). "Comet Holmes Undergoes Huge Outburst". Sky & Telescope. 2007-10-25 रोजी पाहिले.