Jump to content

जॅग्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅग्वार विमान

भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. 'जग्वार' हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला असे मानले जाते. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. १९७९ पासून होतो आहे.

स्वरूप

या विमानांचा पल्ला सुमारे ८५० कि.मी. चा आहे. जग्वार विमानांची अदूर नावाची इंजिन यंत्रणा रोल्स राईस ही कंपनी बनवते आणि त्याला फेडरल एव्हिएशन स्टॅडर्ड आणि ब्रिटीश एव्हिएशन स्टॅडर्ड ने प्रमाणित केलेले असते. ही इंजिने वेळ पडल्यास ३० मिनिटात बदलता येतात. भारतात वापरात असलेल्या या विमानामध्ये सध्या सुधारणा करून त्यावर ऑटोपायलट ही यंत्रणा बसविण्यात येते आहे. आखाती युद्धा नंतर इंग्लंड आणि फ्रान्सच्या विमानांमध्ये जीपीएस यंत्रणा त्वरेने बसवण्यात आली. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. त्यामुळे विमानाची जमिनीपासूनची उंची, पंखांचा जमिनीपासूनचा कोन आदींची योग्य माहिती होणे अतिशय आवश्यक असते. ही माहिती वैमानिकाला या यंत्रणेमुळे सहजतेने मिळते. ही नियंत्रण यंत्रे पूर्णपणे कडक चाचणीतून जातात. तसेच अति उंचीवरून उडतांना वैमानिकांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी विमानांमध्ये प्राणवायूच्या टाक्या बसविलेल्या आहेत.

प्रहार क्षमता

या विमानांच्या नौदलाच्या तुकडीवर जहाजविरोधी हार्पून-२ क्षेपणास्त्रे बसवण्यात आले आहेत.

वापर

आखाती युद्धात इंग्लंड आणि फ्रान्सने या विमानांचा वापर विश्वासार्ह ठरला असे दिसून आले. तसेच भारताने श्रीलंकेत शांतीसेनेच्या कारवाईतही यांचा वापर केला गेला. कारगील युद्धात या विमानांनी महत्त्वाची कामगिरी केली.

वापरकर्ते देश

या सारखी इतर विमाने

हेही पाहा