इ.स. १९७४
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७१ - १९७२ - १९७३ - १९७४ - १९७५ - १९७६ - १९७७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
- जानेवारी ४ - अमेरिकन सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.
- फेब्रुवारी १ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
- फेब्रुवारी ७ - ग्रॅनडाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- फेब्रुवारी ८ - अपर व्होल्टात सैनिकी उठाव.
- फेब्रुवारी १३ - सोवियेत संघाने अलेक्झांडर सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
- फेब्रुवारी १७ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
- फेब्रुवारी २१ - इस्रायेलने सुएझ कालव्याचा ताबा सोडला.
- मार्च ३ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.
- एप्रिल १३ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
- एप्रिल २५ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
- मे ८ - कॅनडाचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.
- मे ९ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या विधीमंडळाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनविरुद्ध महाभियोग सुरू केला.
- मे १७ - लॉस एंजेल्समध्ये पोलिसांनी सिंबायोनीझ मुक्ति सेनेच्या कार्यालयावर हल्ला केला. ६ ठार.
- मे १७ - आयर्लंडच्या डब्लिन व मोनाघन शहरांत अतिरेक्यांचे बॉम्बहल्ले. ३३ ठार.
- मे १८ - भारताने पोखरण १ परमाणू परीक्षण केले. परमाणू ताकद असणारा सहावा देश झाला.
- मे ३१ - यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह.
- जून ६ - स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
जुलै-डिसेंबर
- जुलै २० - तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.
- जुलै २४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
- जुलै २७ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकन कॉँग्रेसच्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
- ऑगस्ट ८ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा जाहीर केला.
- ऑगस्ट ९ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
- डिसेंबर १ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
- डिसेंबर १३ - माल्टा प्रजासत्ताक झाले.
जन्म
- जानेवारी २७ - चमिंडा वास, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- एप्रिल १७ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
- जून ५ - मर्व्हिन डिलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून ७ - महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
- सप्टेंबर २७ - पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - मॅट निकलसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २९ - मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १९ - रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.