निकोबार द्वीपसमूह
Appearance
निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.
या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो
- कार निकोबार
- चौरा
- तेरेसा
- पोहाट
- कामार्ता
- कच्छल
- नानकॉवरी
- छोटे निकोबार
- मोठे निकोबार