Jump to content

जॅग्वार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅग्वार विमान


भारतीय हवाई दलासाठी छोटी लढाऊ योग्य

वजनाने हलकी, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीची व आकाराने छोटी लढाऊ विमाने आपल्या वैमानिकांनी अतिशय प्रभावीरित्या वापर्ल्याचा इतिहास सर्वांनाच दण्यात आहे. तरीही आपण सध्या शक्तिशाली, बोजड, हायली सोफिस्टिकाटेड विमानांच्या चर्चेत छोट्या विमानांचे महत्वा पार विसरून गेलो आहोत.कारगिलचा इतिहास फारसा जुना नाही. मिरज विमानांच्या अचूक बॉम्बफेकीमुळेच आपण अनेक घुसखोरांना एकाच वेळी यमसदनी पाठवू शकलो. आणि सुरुवातीलाच आपल्या सैन्याचे मनॉधैर्य उंचावण्यास मदत झाली. आपल्या उत्कृष्ठ वैमानिकांनी छोट्या लढाऊ विमानांचा वापर कसा सुरेखपणे केला याचे एक उत्तम उदाहरण म्हणून कारगिल युद्धाकडे पाहता येईल.

गेल्या बारा वर्षांच्य कालावधीत आपण जितकी नवी लढाऊ विमाने भारती केली त्या पेक्षा किती तरी अधिक विमाने सेवा निवृत्त झाली. अर्थात सुखोई विमानांच्या समावेषाने "क्वालिटी" चा प्रश्ना सुटला असला तरी "क्वांटिटी" च्या प्रश्नाचे काय याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळत नाही. कारण विमानांच्या एकूण संख्येच्या बाबतीत आपण अजूनही बरेच कमी पडतोय हे स्पष्ट दिसतय. आपली सुधारित मिग २१ विमाने निश्चितच उपयुक्त अशीच आहेत. परंतु मिग २१ विमानांची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता अतिशय कमी आहे. शिवाय या वेगवान विमानांना कमी वेगाने उडत हवाई कसरती करणे शक्य होत नाही. याचे कारण यांचा विशिष्ठ आकार. त्यामुळे "हौक" सारखी छोट्या आकाराची विमाने अधिकाधिक संख्येने टप्प्या टप्प्याने खरेदी करून आपण येत्या पाच वर्षात एकनवी फळीउभी केली पाहिजे. किंवा ब्रिटीश बनवाटी च्या जुन्या"नॅट" सारख्या पारंपरिक आकाराची छोटी लढाऊ विमानेसुद्धा हवाई संरक्षणासाठी योग्य ठरतील.


सध्याची प्रशिक्षक विमानेच इतकी अत्याधुनिक आणि शास्त्रासज्जा बनलेली आहेत की हीच विमाने आपण गरज पडल्यास प्रत्यक्ष युद्धात हवाई संरक्षणासाठी किंवा आक्रमाणसाठी सहजपणे वापरु शकू. आत पहा, आपले सध्याचे मिग २१ विमान जेमतेम अडीच टन वजनाची शस्त्रे वाहू शकत.आणि या विमानांवर आक्रमण आणि संरक्षण अश्या दोन्ही कामगिर्या सोपविल्या आहेत. आणि सध्या उपलब्ध असलेली हौक, सी१०१ एविओ जेट किंवा एल.३९ आल्बेट्रोस सारखी प्रशिक्षक विमाने साधारण तेवढाच शास्त्रभर वाहू शकतात. शिवाय प्रशिक्षक विमानांमध्ये दोन वैमानिक असू शकतात. तांत्रीक दृष्ट्या देखील ही विमाने अतिशय प्रगत बनलेली आहेत. फक्त या विमानचा वेग मात्र कमी असतो. वेग हा महत्वाचा घटक असला तरी शत्रूच्या घुसखोर लढाऊ विमानांविरुद्धा आपल्या हद्दीत दोन हात करण्यास ही विमाने निश्चितच सक्षम ठरतील. अशी हवाई संरक्षक विमाने मोठ्या संख्येने तैनात ठेवली तर शत्रूला आपल्या लक्ष्यापर्यंत पाहोचणे अधिक कठीण जाईल.

लढाऊ विमाने खरेदी करताना उपलब्धहा असलेल्या विमानांमध्ये जी विमाने सर्व बाबतीत अतिशय सरस असतील ती आपण खरेदी करतो. अर्थात आपल्या बजेट चा विचार करून. परंतु चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने एकमेकांच्या इतकी तोडिस तोड बनत आहेत की आपल्या सारख्या संरक्षणखरेदीच्या बाबतीत श्रीमंत राष्ट्राची देखील गोची होऊन बसते. आणि त्यात सध्या दहशत वाद रूपी छुप्या आणि अचानक घात करणार्‍या युद्धातसुदैवानेकमीत कमी उघड उद्धे तरी होणे कमी होत आहेत. त्यामुळे नव्या लढाऊ विमानांना योग्य चाचणी क्षेत्रा प्राप्त होत नाही. म्हणून मग आपल्याला ही अतिशय गुंतागुंतीच्या निवडप्रक्रियेतुन जावे लागत आहे. परंतु तरीही या बाबतीत दिरंगाई करून चलणारी नसल्यामुळे सरकारने अशा प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्वरित मार्ग काढला पाहिजे.

आपली अर्थ व्यवस्था मोठ्या प्रमाणात विकसित आणि विस्तारीत होत असल्यामुळे शत्रु राष्ट्रांची नजर आपल्या मुख्य शहरांवर आणि प्रकल्पांवर असण्याची शक्यता कायम राहणार. अशा परिस्थिती अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करणे क्रमप्राप्त तर आहेच आणि आपले परम् कर्तव्य देखील आहे.

छोट्या लढाऊ विमानांच्या नव्या फळीचा विचार तर दूरच, तातडीने आवश्यक असलेली एकशे सहवीस मल्टीरोल विमाने देखील आपल्या सेनेला वेळेवर मिळत नाहीत. ती लवकरात लवकर वायुसेनेत दाखल झाली नाहीत आणि नजीकच्या भविष्यात जर एखादे युद्ध पेटले तर आपल्याला लढाऊ विमानांचा तूत्वडा भासणार हे निश्चित. मिग-३५, एफ्-३५, एफ्-१८, एफ्१६, युरोफाइटर, रॅफेल असे एकापेक्षा एक सरस पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असून देखील आपण निवडप्रक्रियेत अनावश्यक गोंधळ घालून माहगात पडू शकणारी दिरंगाई करत आहोत. फ्रेंच तन्त्र्द्न्यान हे आता पर्यंत तरी आपल्याला चांगले सिद्ध झाले असल्यामुळे रॅफेलचा पर्याय सर्वात योग्य वाटतो. परंतु त्याची किंमत आपल्याला परवडणारी नसल्यामुळे पुन्हा रशियन मिग-३५ विमानांनाच पसंती मिळेल की काय असे वाटते.

खरं म्हणजे आधी उल्लेखील्याप्रमाणे अशी वजनाने जड व जास्त भार वाहू शाकणारी विमाने कमी संख्येने खरेदी करून उरलेल्या पैशात जास्तीत जास्त छोटी विमाने खरेदी करणे शक्य आहे का हे पाहावयास हवे. आपले हिंदुस्तान एरोन्ौटिकस अशा विमानांच्या डिझाइन चे आणि उत्पादनचे काम झटक्यात करू शकते. परंतु तातडीची गरज म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम छोट्या विमानांचा विचार करण्यास हरकत नाही. अशा छोट्या लढाऊ विमानांची एक मोठी फळी शस्त्रसज्ज करून आपण आपल्या हवाई दलाला एक नवी शक्ति प्राप्त करून देऊ शकतो.

अशा परिस्थिती अनुरूप पावलांसोबतच पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचा समावेषा बाबत चे पाऊल देखील तितकेच महत्वाचे आहे.

लेखाच्या शेवटी आणखी एका गोष्टीची वाचकांनी नोंद घ्यावी. निवृत्त झालेल्या मिग२५ फॉक्स बॅट विमानांची जागा कुठली नवी विमाने घेणार या बद्दलचे स्पष्टीकरण अद्याप कुठेही वाचण्यात, पाहण्यात, किंवा ऐकण्यात आलेले नाही.ही विमाने अतिशय वेगवान अशी टेहळणी विमाने होती.

समाप्त


लेखक: विशाल शामराव बुलबुले पत्ता: ३८०, शुक्रवार पेठ, सोलापूर मोबाइल:-९९६०७१७०८७ ए मैल: vishalbulbule@yahoo.com

( If article is going to publish, I request you to give my e mail address also along with name.)