कॉक्स बझार
कॉक्स बझार, पानोवा तथा पालोंकी [१] [२] हे नैऋत्य बांगलादेशमधील एक शहर, मासेमारी बंदर, पर्यटन केंद्र आणि जिल्हा मुख्यालय आहे. कॉक्स बझार बीच ही बांगलादेशमधील सर्वात लोकप्रिय पुळण आहे. ही जगातील सर्वात लांब अखंड नैसर्गिकरित्या उद्भवलेली पुळण आहे. [३] [४]
२०२२मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे २,००,००० होती.[५] कॉक्स बझार रस्ते आणि हवाई मार्गाने चितगावशी जोडलेले आहे. [६] [७]
या शहराला कॅप्टन हायराम कॉक्स या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे.साचा:Cox's Bazar weatherbox
वाहतूक
विमानतळ
कॉक्स बझार विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. हा बांगलादेशातील सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानतळांपैकी एक असून बिमान बांगलादेश एरलाइन्स, यूएस-बांगला एरलाइन्स, नोव्होएर आणि रीजेंट एरवेझ येथून विमानसेवा देतात. येथील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिला जाईल[९] [१०]
रेल्वे
कॉक्स बझार रेल्वे स्थानक येथील मुख्य रेल्वे स्थानक आहे. बांगलादेश रेल्वे येथून चटगाव-कॉक्स बाजार मार्गावर रेल्वेसेवा पुरवते. येथून ढाकालाही थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे. येथील नवीन स्थानकाचे उद्घाटन १ डिसेंबर, २०२३ रोजी झाले.[११] [१२]
संदर्भ
- ^ "Huge fire at Rohingya refugee camp leaves thousands without shelter | Bangladesh | the Guardian".
- ^ "A Glimpse at Camp Life in Cox's Bazar: Examining Aid Response". 13 April 2023.
- ^ Rongmei, Precious. "Have you been to the longest beach in the world?". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-09-12 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh's Cox's Bazar: A paradise being lost?". BBC News. 2012-12-26. 2022-04-30 रोजी पाहिले.
- ^ "Area, Population of Cox's Bazar". citypopulation.de.
- ^ "Cox's Bazar, Bangladesh". Encyclopædia Britannica. 12 January 2015. 14 January 2008 रोजी पाहिले.
- ^ কক্সবাজার জেলা [Cox's Bazar district]. coxsbazar.gov.bd (Bengali भाषेत). 4 December 2018 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;census2011
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "'Cox's Bazar Airport to be made international one'". The Daily Star. 3 April 2012. 11 April 2012 रोजी पाहिले.
- ^ "Cox's Bazar International airport to be upgraded: Minister". The Daily Star. 26 March 2012. 11 April 2012 रोजी पाहिले.
- ^ "Sujan: Tourism to improve when Dohazari-Cox's Bazar rail line completed". Dhaka Tribune. 2020-09-12.
- ^ "PM inaugurates Chattogram-Cox's Bazar Rail line". Dhaka Tribune. 2023-11-11.