नरेंद्र जाधव
नरेंद्र जाधव | |
डॉ. नरेंद्र जाधव | |
जन्म | मे २८, इ.स. १९५३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
निवासस्थान | भारत |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध धर्म |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, लेखक |
वडील | दामोदर जाधव |
डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, इंग्लिश भाषा भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.
जीवन
त्यांचा जन्म एका सामान्य महार कुटुंबात झाला व त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धर्म स्विकारला. वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’आमचा बाप आणि आम्ही' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीसेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
कारकीर्द
डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
पुस्तके
आत्मकथन
- आमचा बाप आणि आम्ही (१६१वी आवृत्ती, मे २०१३)